अनिल स. पिंपळखरे

मी खरोखरच भाग्यवान !
मला गेल्या बारा वर्षांपासून दोन्ही डोळ्यांनी हळूहळू स्पष्ट दिसेनासे झाले, त्याकरता अर्थातच डोळ्यांच्या तपासण्या केल्यावर नेत्रतज्ञांनी मला bilateral climatic keratopathy आहे असे सांगून लेझर ट्रीटमेन्ट द्यावी लागेल असे सांगितले. मी विचारातच पडलो, रात्रीच्या वेळेला समोर फॉर व्हीलरच्या हेडलॅम्पमुळे दिसेनासे व्हायचे, मला ट्रेकिंगची आवड असल्यामुले मी ते सोडणे शक्यच नव्हते. स्पष्ट दिसण्याकरता आकृतीत दाखवल्याप्रमाणे माझ्या चष्म्यांना स्टिकर लावून ते वापरायचो.
कॉर्निया स्पेशलिस्टने Genteal Eye drops मध्ये EDTA प्रमाण सांगितल्याप्रमाणे ते दोन्ही डोळ्यांत टाकून खाली काळ (३ महिने) राहून पहिले पण उपयोग झाला नाही. २ वर्षे होमिओपॅथीच्या गोळ्या व Cineraria Eye drops टाकून पहिले पण काही उपयोग झाला नाही.
NIO चे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत केळकर यांना भेटलो व सर्व सांगितले. त्यावर त्यांनी मला “मी तुम्हाला लेझर ट्रीटमेन्टचा सल्ला देणार नाही” असे सांगिले व मी तो कटाक्षाने पळला व गप्प बसलो (काही काळ ). Corneal Transplant (Cornea Transplant ) ला नाव नोंदवा असेही एका Corneal Surgen ने सांगितले , पण अर्थातच तो शेवटचा उपाय.
शेवटी पुन्हा NIO मध्ये डोळे तापसण्याकरता आलो असता अचानकपणे डॉ. सौ. जाई आदित्य केळकर यांच्याकडे तापसण्याकरता नंबर लावला, त्यांच्याशी उलट सुलट चर्चा करून सविस्तर सर्व रिपोर्ट्स दाखविले.
नंतर डॉ. जाई केळकर यांनी मला EDTA ने Chelation करण्याचा सल्ला दिला, तो मी ऐकलं आणि काय आश्चर्य! ह्या Chelation प्रक्रियेमुळे त्यांच्या कुशल शस्त्रक्रियेमुळे त्यांनी माझ्या दोन्ही डोळ्यांचे कॉर्निया स्वच्छ व पारदर्शक केले.
तसेच नुकतेच त्यांनी माझ्या माझ्या दोन्ही डोळ्यांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन करून माझ्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्ववत आणून दिली आहे. त्यामुळे मी डॉ. सौ. जाई आदित्य केळकर तसेच डॉ. श्रीकांत केळकर यांचा कायम ऋणी आहे. ही सर्व मंडळी अर्थातच अनेक रुग्णांना दृष्टी देण्याचे महान कार्य करत आहेत.
विशेष म्हणजे डॉ. सौ. जाई आदित्य केळकर ह्यांनी माझ्या दोन्ही डोळ्यांचे कॉर्निया पारदर्शक केल्यामुळे मला नेत्रदान करण्यास पात्र केले आहे आणि अर्थातच मी १००% नेत्रदान करणार.