सौ. विनया गाडगीळ

आज तुमच्या रुग्णालयात माझी (सौ. विनया विश्वास गाडगीळ) मोतीबिंदूची शस्त्रक्रिया तुम्ही अत्यंत कौशल्याने व क्षणाची वेदना होऊ न देता केलीत त्याबद्दल मी सदैव तुमची ऋणी राहीन.
तुमची अलौकीक बुद्धिमत्ता व हस्तलाघव ही तुम्हाला लाभलेली परमेश्वरी देणगीच आहे.
प्रवेशद्वारापासूनचा तुमचा कर्मचारी वर्ग, परिचारक व परिचारिका, मदतनीस, डॉक्टर्स प्रेमळ, नम्र व सेवाभावी आहेत.
तुम्हा सर्वांना परमेश्वर उदंड आयुष्य व आरोग्य देवो आणि तुमच्या हातून अशीच सेवा अविरत घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कृतज्ञापूर्वक धन्यवाद !