एन.आय. ओ या हॉस्पिटलमध्ये गेले १३ ते १४ वर्षे आम्ही दोघे (सौ. सविता नवरे ) येत आहोत. मिस्टरांचे ऑपरेशन झाले. यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू, रॅटीना, हॅलीडींग असे प्रॉब्लेम होते. खूप मोठे ऑपरेशन आहे पण उद्या दुसऱ्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाला तर जे या डोळ्याने थोडे दिसेल तेच भरपूर असेल असे डॉ. आदित्य म्हणाले आणि त्यांनी उजवा डोळा बंद करायला सांगितला आणि रेष लावायचा टॉर्च द्यायला सांगितला. तो मला देता आला नाही म्हणून डाव्या डोळ्याचे ऑपरेशन केले. त्या डोळ्याने ऑपरेशननंतर थोडे दिसते.
नंतर दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन २० जूनला केले. (मोतीबिंदूनेही) त्यानेही चांगले दिसते. नवीन चष्म्याने अधिक चांगले (वाचन) दिसेल असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे धीर आला. खूप आनंद झाला.
आम्ही मधून मधून हॉस्पिटलला येत असतो. व्यवस्थापकीय कर्मचारी मंडळी आम्हाला उत्तम सहकार्य करतात. सिस्टर्सही चांगले सहकार्य करतात. राग, आळस त्यांना नाही. इतर डॉक्टर्सही आदित्य सरांप्रमाणे वागतात. आदित्य सर तर परमेश्वरच आहेत. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर एकदम प्रसन्न आणि समाधानी वाटते. वर्तमानपत्रात त्यांच्या यशाच्या बातम्या वाचायला मिळतात. हे सर्व पाहून आनंद वाटतो.
डॉक्टरांच्या हातून असंच काम होत राहावं आणि जगाला त्याचा उपयोग व्हावा ही सदिच्छा !!!