Why are injections given?

The central part of the retina (macula) gets affected and swollen due to conditions such as diabetic maculopathy, age related macular degeneration (WET type) and vascular occlusions etc. To control or prevent further damage from these conditions intravitreal injections are given.

Different types of injections are as follows:

SR NO. NAMES OF INJECTIONS
1 Razumab
2 Accentrix
3 Lucentis
4 Pagenax
5 Ozurdex
6 Eyelea

Injection procedure is as follows:

Injection procedure is carried out in operation theater. The eye is made numb by use of anesthesia eye drops prior to giving the injection.

Advantage of injection treatment

It can stabilize the vision and, in some cases, can improve the vision to some extent.

Limitations of injection treatment

  • Majority of the patients need to take injections on periodic
  • After injection treatment regular follow-up is
  • As per the condition of the eye regularly one may have to undergo for tests such as
  • Also, in some patients in addition to injections, laser or surgery may be

Complications of injection treatment

  • Some patients get redness of eye following injection & may see some black spots (floaters).
  • In some patients, even after injections they do not get expected outcomes and the vision may still worsen even after treatment.
  • Complications of injections are intraocular infections, bleeding, floaters, red eye, retinal detachments etc.

This information leaflet does not contain all the information about injections. In case you have any query or questions please ask your doctor

डोळ्यात इंजेक्शन का देतात?

डोळ्याच्या पडद्याच्या मध्यभागाच्या काही आजारांवर उदा.वयोमानामुळे नेत्रपटलावर येणारी सूज,

डायबेटीस मुळे नेत्रपटलावरची सूज, किंवा नेत्रपटलाची रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे पडद्यावर येणारी सूज ई. यासारख्या आजारांसाठी डोळ्यामध्ये इंजेक्शन देण्याची उपचार पद्धत प्रचलित आहे.

डोळ्यातील इंजेक्शनचे प्रकार पुढील प्रमाणे प्रचलित आहेत.

SR NO. NAMES OF INJECTIONS
1) राझूमॅप
2) असेंट्रिक्स
3) लुसेंटिस
4) पेगनेक्स
5) ओझुर्डेक्स
6) आयलिया

 

इंजेक्शन ची प्रक्रिया पुढील प्रमाणेआहेत.

डोळ्यात हे इंजेक्शन देण्याची प्रक्रिया शस्त्रक्रिया विभागामध्ये (OPERATION  THEATRE) होते. डोळ्यात भूल देण्याचे थेंब टाकून डोळा बधिर करून हे इंजेक्शन नेत्रतज्ञ देतात.

इंजेक्शनचे फायदे काय आहे?

इंजेक्शन मुळे दृष्टी थोडीफार सुधारण्यास व आहे तेवढी राहण्यास मदत होते.

१) इंजेक्शन उपचारांच्या मर्यादा

१) इंजेक्शन प्रक्रियेनंतर नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे .२) गरजे अनुसार ओ सी टी स्कॅन ई. तपासण्याही कराव्या लागू शकतात. त्याच प्रमाणे इंजेक्शन शिवाय काही रुग्णांना शस्त्रक्रिया, लेझर उपचार करावे लागू शकतात. ३) बहुतेक सर्व रुग्णांना इंजेक्शन वारंवार घ्यावे लागते.

२) इंजेक्शनचे काही महत्वाचे दुप्षरीनाम

१)इंजेक्शन नंतर डोळ्याला लालसरपणा येतो व डोळ्यासमोर काळे ठिपके/ फ्लोटर्स  दिसतात.

२)काही रुगांना इंजेक्शन देऊन सुद्धा अपेक्षित परिणाम प्राप्त होत नाही व नजर कमजोर होते.

३)जंतुसंसर्ग, नेत्रपटल सरकणे , रक्तस्त्राव होणे, डोळा लालसर होणे, डोळ्यासमोर काळे ठिपके दिसणे ई

या माहिती पत्रकामध्ये इंजेक्शन बद्दल सर्व माहिती देणे शक्य नाही आपण आपल्या डॉक्टरांना इच्छित असलेले कोणतेही प्रश्न भेटून विचारू शकतात