टेरिजियम
टेरिजियम म्हणजे काय?
डोळ्याच्या बुबुळावर पांढऱ्या भागावरील पडदा जो अनैसर्गिकरित्या वाढलेला आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत टेरिजियम म्हणतात (ह्याला बोली भाषेत मांस किंवा वेल वाढणे असेही म्हणतात). टेरिजियम हा त्रास एक किंवा दोन्ही डोळ्यांना होऊ शकतो. हे काढण्यासाठी केवळ शस्त्रक्रिया हाच उपचार आहे.
टेरिजियमचा नजरेवर परिणाम होऊ शकतो का?
हो, टेरिजियमची वाढ झालयास दिसायला त्रास होऊ शकतो. टेरिजियम मुळे होणारे बुबुळावरचे डाग हे आयुष्यभर राहतात आणि टेरिजियमच्या शस्त्रक्रियेनंतर हे डाग पूर्णपणे जात नाही.
टेरिजियम शस्त्रक्रिया म्हणजे काय? ऑटोग्राफ्ट म्हणजे काय?
टेरिजियम शस्त्रक्रिया मध्ये डोळ्यातील पांढरा पापुद्रा (कंजंक्टायव्हल ग्राफ्ट) काढून, अनैसर्गिक वाढलेला पडद्याच्या जागी बसवला जाईल, ज्यामुळे काढलेला पडदा बुबुळावर परत येण्याची शक्यता कमी होते. ऑटोग्राफ्ट म्हणजे काढलेल्या पडद्याच्या जागी पांढऱ्या पापुद्र्याचे (कंजंक्टायव्हल ग्राफ्ट) प्रत्यारोपण करणे. या प्रत्यारोपणासाठीचा पापुद्रा टाक्यांनी किंवा जैविक डिंकासारख्या औषधाने (टीश्यू ग्लू) चिकटवला जातो. ज्यामुळे डोळ्याला टोचण्याचा त्रास होऊ शकतो.

एमएमसी म्हणजे काय?
एमएमसी म्हणजे मिटोमायसिन सी. हे औषध शस्त्रक्रिये दरम्यान वापरले जाते ज्यामुळे काढलेला पडदा परत वाढण्याची शक्यता कमी होते.
टेरिजिअम शस्त्रक्रिये नंतर दृष्टी सुधारणा
शस्त्रक्रियेनंतर नजर सुधारणे साठी चष्माची गरज भासू शकते जे ६-८ आठवड्यानंतर फेरतपासणी दरम्यान सुचविले जाते.
शस्त्रक्रिये नंतर वेल पुन्हा येऊ शकते का?
हो. १.९% - ५.३% टक्के लोकांमधे वेल शस्त्रक्रिये नंतर पुन्हा येउ शकते.
टेरिजियम शस्त्रक्रिये नंतर चे धोके काय आहेत?
डोळ्यांना खाज येणे/ पाणी येणे, हलकी संवेदनशीलता, जंतु संसर्ग, रक्तस्त्राव, दोन प्रतिमा दिसणे, कंजंक्टायव्हल ग्राफ्ट मध्ये दोष संभवणे, दिव्याभोवती वर्तुळे दिसणे, बुबुळावर डाग, चष्मा लागणे, दृष्टी गमावण्याची किंवा डोळा गमावण्याची शक्यता अतिशय दुर्मिळ असते.